1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (16:16 IST)

अवनीचा मृत्यू अंगाशी मुख्यमंत्री म्हणतात त्याची चौकशी होणार

devendra fadnavis
अवनी  वाघिणीला गोळी घालून ठार मारल्याप्रकरणी देशात संताप होत असून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे यवतमाळ येथील गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. यावरून वनमंत्र्यांवर टीकेची झोड उठलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघिणीचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे. त्यावर अवनीच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहे.  वाघिणीच्या मृत्यूवरून कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही. उलट दु:खच आहे. तिच्या मृत्यूबाबत आता काहीजण आक्षेप नोंदवत आहेत. वाघिणीने हल्ला केल्यानंतर बचावासाठी झालेल्या गोळीबारात ती मारली गेली असेही कारण पुढे आले आहे. आधी तिला बेशुद्ध करून पकडावे व नंतर तिचे पुनर्वसन करावे असा नियम आहे. पण त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती ते तपासून बघावे लागेल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.