शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (08:50 IST)

राज्यात २० हजार पोलिसांची पदे भरली जाणार ,देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली

devendra fadnavis
मागील दोन वर्षापासून कोविड व अन्य कारणांमुळे रखडलेली पोलीस भरती आता राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यात आता तब्बल २० हजार पोलिसांची पदे भरली जाणार असल्याची माहिती  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: प्रसार माध्यमांना दिली.
 
“एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी घेतलेला आहे. तो म्हणजे दोन वर्षांची पोलीस भरती आता आम्ही हाती घेत आहोत. साधारणपणे पोलिसांची २० हजार पदे भरण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे.” असं फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
 
याचबरोबर “या संदर्भातील कार्यवाही आम्ही लवकरात लवकर करू. जवळपास साडेसात ते आठ हजार पदांची एक जाहिरात निघालेली आहे. अजून १२ हजार पदांची एक जाहिरात ही लवकरच आम्ही काढणार आहोत. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर पोलीस भरती आम्ही करणार आहोत. मला असं वाटतं यामुळे पोलीस दलाला निश्चतपणे फायदा होईल.” असं ते म्हणाले