शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जून 2020 (10:59 IST)

धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे.
 
यामध्ये मुंडेंचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी आणि बीडच्या वाहन चालकाचा समावेश आहे. धनंजय मुंडे यांनी चार दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यात करोनाची टेस्टिंग करणाऱ्या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले होते.
 
धनंजय मुंडे हे करोनाची बाधा होणारे राज्य सरकारमधील तिसरे मंत्री ठरले आहेत. याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली.