शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (08:44 IST)

धर्मवीर हा केवळ व्यावसायिक सिनेमा - केदार दिघे

anand dighe
धर्मवीर हा केवळ व्यावसायिक सिनेमा आहे. आनंद दिघे हे फक्त 3-4 लोकांमध्ये कधीच राहिले नाहीत, असं वक्तव्य त्यांचे पुतणे केदार दिघे यांनी केलं आहे.
 
केदार दिघे यांनी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केलं.
 
"आनंद दिघे यांचे चाहते संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. अनेकांच्या आयुष्यात दिघेंमुळे आमुलाग्र बदल झाले आहेत. ते 3 तासांच्या सिनेमात बसू शकत नाही. त्यांच्या आयुष्यावर वेब सिरीज बनवावी लागेल," असं केदार दिघे यावेळी म्हणाले.