मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (21:48 IST)

अठरा वर्षांपूर्वी आईला पळवून नेल्याच्या रागातून नदीपात्रात फेकून दिल्याचा प्रकार

murder
अठरा वर्षांपूर्वी आईला पळवून नेल्याच्या रागातून एका इसमाला मारहाण करुन प्रवरा नदीपात्रात (Pravara River) फेकून दिल्याचा प्रकार पाच दिवसापूर्वी संगमनेरमध्ये (Sangamner) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 
या प्रकरणात आता पोलिसांनी (Police) आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. आठ जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 307, 364, 120 (ब), 201, 323, 504 प्रमाणे अपहरण करून खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
 
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील रेठेवाडी येथे अठरा वर्षांपूर्वी एका इसमाने एका महिलेला पळून गेले होते. त्यावेळी तिचा मुलगा 9 वर्षाचा होता. या घटनेमुळे तिच्या मुलाच्या मनात बदल्याची भावना तयार झाली होती. या मुलाने आपलय मित्रांच्या सहकार्याने कट रचला.
 
बळजबरीने अपहरण
 
आपल्या आईला पळवून नेणाऱ्या बाळू शिरोळे यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने नाशिक-पुणे रोडवरील घुलेवाडी फाटा येथून बळजबरीने अपहरण करुन नेले. यावेळी कमरेच्या बेल्टने त्याला मारहाण केली. इतर दोघांनी दगड उचलून बाळु यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे डोक्यात दगड मारून जखमी केले.
 
जखमी बाळु अर्धमेला झाल्याची खात्री करुन जखमी बाळु रास मोटारसारकलवर बसवुन नाशिक-पुणे महामार्गावरील कासारवाडी शिवारातील प्रवरा नदीचे पात्रात बाळु यास पुलावरुन फेकुन दिले. पाच दिवसानंतरही या इसमाचा मृतदेह आढळला नाही याबाबत स्वतः पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख रांनी शहर पोलीस ठाण्रात फिर्याद दिली.
 
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
या फिर्यादीवरून पोलिसांनी सागर शिवाजी वाडगे, शिवाजी गेणुभाऊ वाडगे, दत्ता वाडगे, अण्णा वाडगे (सर्व राहणार रेठेवाडी, खंदरमाळ ता. संगमनेर), संपत मारुती डोळझाके (रा. साकुर ता. संगमनेर), मनोज एकनाथ चव्हाण (रा. पेमगिरी ता. संगमनेर), शुभम सुनिल खताळ (रा. धांदरफळ ता. संगमनेर), दाऊ उर्फ दिनेश बाळु जेधे (रा. घुलेवाडी ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 679/2022 भारतीय दंड संहिता कलम 307, 364, 120 (ब), 201, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करत आहे.