बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (08:26 IST)

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन

लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर (१०४) यांचे मंगळवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंतपणे समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती. 
 
या सगळ्या प्रकारानंतर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना उपचारासाठी नांदेडमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. सोमवारी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे स्वतः अविवाहित असल्यामुळे त्यांनी त्यांचे सख्खे भाऊ मन्मथ स्वामी यांच्या नातवांना उत्तराधिकारी जाहीर केले आहे.