रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (07:29 IST)

दिंडोरी – केंद्रीय मंत्रीमंडळात खासदार डॅा. भारती पवार, भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

लोकसभा मतदारसंघातील  खासदार डॉ. भारती पवार यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील निवडीची वार्ता समजताच दिंडोरी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटत व फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.
 
याप्रसंगी गटनेते प्रमोदशेठ देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नामदार डॉ भारती पवारांच्या रुपाने केंद्रीय मंत्रीपद देऊन अनेक वर्षांपासून प्रतिक्षीत  न्याय दिला असे प्रतिपादन केले व भारतीय जनता पार्टी,दिंडोरी तालुक्याच्या वतीने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
 
प्रथम महिला केंद्रीय मंत्रीपद खा. भारती पवार रुपाने नाशिक जिल्ह्यास प्राप्त झाले आहे तसेच अभ्यासपूर्ण कर्तव्यपुर्ती ,शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रश्न संसदेत मांडणे व त्यास योग्य पाठपुराव्याने तडीस नेणे या व इतर कार्यकुशल गुणांची दखल केंद्रीय नेतृत्वाने घेत उच्चशिक्षित महिला प्रतिनिधीस मंत्रीपदाची ही संधी देऊन योग्य व पात्र व्यक्तिमत्वास जनतेच्या भावना ओळखून त्यांचा एक प्रकारे सन्मानच केला अशी भावना भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस तथा नगरसेवक तुषार वाघमारे यांनी व्यक्त केली. तसेच मिळालेल्या मंत्रीपदाचा दिंडोरी तालुका तसेच लोकसभा मतदारसंघासाठी अधिकतम ऊपयोग करून डॅा. भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकासात्मक दृष्टिकोन ठेवूनच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यरत रहातील असे सांगितले.
तसेच शहराध्यक्ष शामराव मुरकुटे यांनी उत्तर महाराष्ट्रात प्रभावशाली चेहरा डॉ भारती पवार रुपाने देऊन केंद्रीय नेतृत्वाने आदिवासी बहुल भागास न्याय दिला असे सांगितले. सर्व नागरिकांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्रीपद आल्याच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.