पूरग्रस्त भागातील नागरिकांचे आजारनिहाय सर्वेक्षण

Last Modified बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (10:21 IST)
पूरग्रस्तभागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. छावण्यांमध्ये जाहिर आवाहन करून ज्यांना या आजाराच्या गोळ्या सुरू आहेत त्यांना त्याचे वाटप केले जात आहे. मदत छावण्यांमध्ये तपासणी केलेल्या रुग्णांचे ताप, अतिसार आणि कावीळ या आजारनिहाय सर्व्हेक्षण देखील केले जात आहे. दरम्यान, राज्यभरात सध्या 570 वैद्यकीय मदत पथके असून कोल्हापूर येथे 196 तर सांगली येथे 144 पथके कार्यरत आहेत.
मदत छावण्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून तेथे ठेवलेल्या नोंदवहीत आजारनिहाय माहिती ठेवली जाते. दररोज सायंकाळी त्याचा एकत्रित डेटा तयार करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिली.

स्थलांतर करताना अनेक जण केवळ अंगावरील कपड्यावरच घराबाहेर पडले. ज्यांना मधुमेह, रक्तदाब आदी आजारासंबंधी औषधोपचार सूरू होता त्यांना दररोज गोळी घेता यावी, त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊन नये यासाठी, मदत छावण्यांमध्ये राहत असलेल्या नागरिकांना मधुमेह, रक्तदाबाच्या गोळ्या सुरू आहेत का याची विचारणा आरोग्य कर्मचारी करीत आहेत. त्यांना सात दिवस पुरतील अशा गोळ्या देखील मोफत वाटप करण्यात येत आहेत. शासकीय दवाखान्यात या गोळ्या उपलब्ध नसतील तर खासगी दुकानातून विकत घेऊन त्याचे वाटप करण्याचे निर्देश दिले असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
काही भागात मदत छावण्यांमधून नागरीक घराकडे परतत आहेत. त्यांना पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या गोळीचा वापर कसा करावा याची देखील माहिती दिली जात आहे. गर्भवती महिलेस पाणी उकळून देण्याच्या सूचना दिल्या जात आहेत, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

ट्विटर ट्रेंडिगवर असलेल्या हॅशटॅगमध्ये #ShivajiMaharaj टॉप ...

ट्विटर ट्रेंडिगवर असलेल्या हॅशटॅगमध्ये #ShivajiMaharaj टॉप ट्रेंडवर
शिवजयंतीचा उत्साह सोशल मीडियावरही दिसत आहे. सकाळपासूनच ट्विटरवर भारतातील ट्रेंडिगवर ...

किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून तातडीने 23 ...

किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून तातडीने 23 कोटी रुपये मंजूर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंतीनिमित्त किल्ले ...

कोरोना व्हायरसवर लस विकसित

कोरोना व्हायरसवर लस विकसित
पुण्यात कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यात आली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ ...

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दर वर्षी 21 फेब्रुवारीला साजरा केला जातो. युनेस्को संस्थेने 17 ...

शिवजयंती २०२०, न्यूयॉर्क

शिवजयंती २०२०, न्यूयॉर्क
छत्रपती फाऊंडेशनतर्फे आयोजनः अमेरिकेतील 7 वर्ष शिवजयंती साजरी करत आहेत - ह्यावर्षी भारत ...