शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (19:14 IST)

किरीट सोमय्या यांचे वक्तव्य गंभीरतेने घेण्याची गरज नाही

भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे बेजबाबदार वक्तव्य करण्यास प्रसिद्ध आहेत त्यामुळेच मागील लोकसभा निवडणुकीत त्यांचे पक्षाने तिकीट कापले होते त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मांडली आहे.
 
वाधवान प्रकरणी बातमी आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्या प्रकरणाची चौकशी लावण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
 
मात्र भाजपाचे नेते किरीट सोमय्या ज्या पध्दतीने बोलत आहेत ते बेजबाबदारपणाचे आहे असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. 
 
आयएएस, आयपीएस अधिकारी पंतप्रधान कार्यालयाच्या अधीन येतात. त्यामुळे केंद्राला वाटत असेल तर ते कारवाई करू शकतात असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.