मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मे 2020 (21:23 IST)

डॉक्‍टर्स आणि नर्सेसच्या पगारात कपात नको, अमित ठाकरेचे पत्र

Amit Thackeray
कोरोनासारख्या वैद्यकीय आणीबाणीत सरकारी रूग्‍णालयातील डॉक्‍टर्स, नर्सेस आपला जीव धोक्‍यात घालून काम करत आहेत. मात्र बंधपत्रित डॉक्‍टर्स आणि  नर्सेसच्या पगारात सरकारने कपात केली आहे. ही कपात अन्यायकारक असून ती तात्‍काळ रद्द करावी, अशी मागणी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. हरियाणासारख्या राज्‍याने वैदयकिय व्यावसायिकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
राज्‍य सरकारकडून तितक्‍या उदारपणाची अपेक्षा नसली तरी डॉक्‍टर, नर्सेसच्या पगारात किंचितही कपात होणार नाही, याची काळजी सरकारने घ्‍यावी, असेही अमित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आधी वेतन आणि भत्‍ते मिळून ७८ हजार इतके मासिक मानधन मिळत होते. मात्र राज्‍य सरकारने २० एप्रिल रोजी काढलेल्‍या आदेशानुसार त्‍यांच्या मानधनात २० हजारांची कपात करण्यात आली आहे. बंधपत्रित नर्सेसच्या पगारातही कपात करण्यात आली आहे. त्‍यांना आधी ३५ हजार इतके एकत्रित मानधन मिळत होते. पण आता त्‍यात कपात करून २५ हजार इतके वेतन देण्यात येत आहे.