बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 14 एप्रिल 2020 (15:47 IST)

बाबासाहेब यांना अमित ठाकरे यांनी अनोख्या पद्धतीने केले अभिवाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या129 व्या जयंतीनिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केलं आहे. अमित ठाकरे यांनी स्वत: रेखाटलेले एक चित्र फेसबुक पेजवर पोस्ट केलं आहे. या फोटोला कॅप्शन देताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केलं आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह एक पुस्तकाचे चित्र काढले आहे. क्रांतिसूर्य यांना विनम्र अभिवादन..!! अशी पोस्टही अमित ठाकरेंनी केली आहे. त्यांच्या या पोस्टला हजारो लाईक्सही मिळाल्या आहेत.
 
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्या दोघांनी आतापर्यंत अनेक चित्र रेखाटली आहे. त्यानंतर आता अमित ठाकरेही चित्रकलेत रस घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.