गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 12 मार्च 2020 (17:10 IST)

डॉ. भागवत कराड यांना भाजपाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी

maharashtra news
मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष व औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना भाजपाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. उदयनराजे भोसले, रामदास आठवले व डॉ. भागवत कराड असे भाजपाचे तीन उमेदवार निश्चित झाले आहेत.
 
या पैकी उदयनराजे भोसले व रामदास आठवले यांनी  आपला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांची उपस्थिती होती. 
 
डॉ. भागवत कराड हे दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपा नेते एकनाथ खडसे, हंसराज आहिर, किरीट सोमय्या, संजय काकडे व विजया रहाटकर यांची देखील नावं चर्चेत होती.