बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जून 2018 (08:50 IST)

डी.एस. कुलकर्णीचा मुलगा आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी सोमवारी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर ते स्वतःहून हजर झाला. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता कुलकर्णी यांनी २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 
शिरीष कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी दिलेली मुदत सोमवारी संपत होती. अखेर शिरीष कुलकर्णी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले. दरम्यान, याआधी ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल सध्या डी.एस.कुलकर्णींसह त्यांच्या परिवारातील अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.