रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (16:09 IST)

खड्ड्यांमुळे बसमध्येच प्रसूती, बाळ दगावले

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गर्भवती महिलेची वाहनातच प्रसूती होऊन नवजात दगावल्याची दु:खदायक घटना घडली आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातून ही बातमी समोर आली आहे. या घटनेवर सगळीकडून शोक आणि संताप व्यक्त होताना दिसत आहे.
 
नेमकं काय घडलं
वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथील रहिवासी समीर शेख यांची पत्नी साजिया गर्भवती होती. सोमवारी रात्रीची वेळ आणि प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे महिला तिच्या पतीसह औरंगाबादला उपचारासाठी रवाना झाली. महिलेने औरंगाबादच्या दिशेने खासगी बस घेतली. मात्र, खड्डे आणि हादरे यामुळे वाहन झोलेगाव पाटीजवळ आले असता रस्त्यावरील एका खड्ड्यात गाडी आदळली आणि याचा जोराचा हादरा साजिया यांना बसला. त्यांनी रस्त्यावरच बाळाला जन्म दिला. मात्र वेळेत रुग्णालय न गाठता आल्याने त्यांचे नवजात अर्भक दगावले. 
 
रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. आई आणि बाळ जीवन आणि मृत्यूशी झुंज देत होते. पण त्यामुळे बाळाचा जीव वाचला नाही. सुदैवाने आई वाचली. समीर व शाजिया हे मुळचे उत्तर प्रदेशातील असून उदरनिर्वाहासाठी ते शिऊर इथे आले आहेत.
 
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे घडलेल्या या घटनेवर आता परिसरासह तालुक्यातून शोक आणि संताप व्यक्त होताना दिसत आहे. 

photo:symbolic