गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

या दोन अटींमुळे राष्ट्रवादीने दिला नाही भाजपाला पाठींबा, नाहीतर भाजपचे सरकार असते

राज्यात झालेल्या सत्तेच्या घोळा नंतर आता सर्व चित्र स्पष्ट होते आहे. त्यात ही महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस ने मोठे राजकीय उलथापालथ केली आहे. राज्याचे २९ वे मुख्यंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, नेते दिवाकर रावते, डॉ. निलम गोऱ्हे यांनी त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
भाजपासोबत युतीत  एकत्र लढूनही शिवसेना निवडणुकीनंतर भाजपासून वेगळी  झाली. तर भाजपा-शिवसेनेविरुद्ध निवडणुका लढविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले. पण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काका शरद पवारांना दे धक्का करत भाजपाला पाठिंबा दिला. त्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 2 अटी मानल्या असत्या, तर भाजपाची सत्ता राज्यात  झाली असती. भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला असता, अशी माहिती आहे. त्यानुसार पहिली अट होती,  मोदी सरकारमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना कृषीमंत्रीपदे देण्यात यावे, आणि दुसरी महत्त्वाची अट राष्ट्रवादीने घातली होती. राष्ट्रवादीची दुसरी अट म्हणजे, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती नको, त्यांच्याऐवजी दुसरं कुणालाही ते पद देण्यात यावे हि होती. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीला कृषीमंत्रपद दिलं, तर बिहारमध्ये जुना मित्रपक्ष रेल्वे मंत्रीपदाचा दावा करेल. त्यामुळे स्पष्ट बहुमत असतानाही. दोन मोठी खाती भाजपाकडून जातील, असे भाजपाला वाटत होते. त्यामुळे भाजपने दोन्ही अटी नाकारल्या होत्या, त्यात मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना हटवणार नाही ही भूमिका घेतली त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा दिला नाही.