testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुणे कचरा प्रश्न ,आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

dumping ground
Last Modified शुक्रवार, 9 जून 2017 (16:38 IST)

पुण्यातील कचरा प्रश्नी उरुळी देवाची आणि फुरसुंगीचे ग्रामस्थांचे आंदोलन मागे घेतले आहे. पालिका आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर 7 मे रोजी पुण्याची कचराकोंडी फोडण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलं होतं. फुरसुंगीकरांनी तब्बल 23 दिवस पुण्याची कचराकोंडी केली होती. मुख्यमंत्र्यांनी आंदोलक ग्रामस्थांकडे एका महिन्याचा अवधी मागितला होता. या एका महिन्यात मुख्यमंत्र्यांनी महापालिका आणि राज्य सरकार मिळून आराखडा सादर करेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र

एका महिन्यानंतरही मुख्यमंत्र्यांकडून कोणताही आराखडा सादर न झाल्यानं फुरसुंगीकरांनी पुन्हा आंदोलनाचा पावित्रा घेतला होता.
यावर अधिक वाचा :