मद्य खरेदीसाठी आता e-tokens
मद्यविक्री सुरु झाल्यापासून वाईन शॉप्समध्ये होणार्या गर्दीमुळे करोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारात येत नाही. अशात महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आता इ-टोकन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
ही सुविधा http://www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना मद्य खरेदी करायचं आहे अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून इ – टोकन प्राप्त करणं गरजेचं आहे.
यासाठी ग्राहकाने आपला मोबाईल नंबर आणि नाव नमूद करायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा आणि पिन कोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटणवर क्लिक करायचं आहे. त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणार्या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल. दुकानाची निवड आणि तारीख निवडल्यावर ग्राहकाला टोकन मिळेल ज्याने ठराविकवेळी गर्दी टाळून दारु खरेदी करता येईल.