शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (14:39 IST)

खासदार भावना गवळींच्या संस्थांवर ईडीचे छापे

भाजपने भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने त्यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या त्यामुळे शिवसेनेच्या (shiv sena)खासदार भावना गवळी (Bhawana Gawli)अडचणीत सापडल्या आहेत.  
 
समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीकडून गवळी यांच्या संस्थेत कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ येथील संस्थांवर धाडी टाकल्या. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्याचं समजतंय. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे ईडीनं या धाडी टाकल्याचं समोर येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीनं धाडी टाकल्याची माहिती समोर आली आहे.