शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (14:17 IST)

Eid-e-Milad 2021: ईद ए मिलाद साजरा करण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली

ईद ए मिलाद हा सण मुस्लिम बांधवांचा आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती सोहळा मुस्लिम बांधव उत्साहाने साजरा करतात.या दिवशी धार्मिक प्रवचन होतात आणि मिरवणूक काढली जाते.यंदा कोरोनाचे प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आणि कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यामुळे हे सण साजरे केले जात आहे. त्या साठी राज्य सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे. यंदाच्या वर्षी 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी ईद ए मिलाद साजरी केली जाणार आहे. त्यासाठी राज्याच्या गृह विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. त्यांचे पालन करूनच हा सण साजरा केला जावा असे सांगण्यात आले आहे. या मध्ये मिरवणूक काढण्यासाठी पाच ट्रकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यात असलेल्या लोकांव्यातिरिक्त अतिरिक्त 5 लोकांना पोलिसांची परवानगी घेऊनच शामिल करता येईल.गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सण साजरे होऊ शकले नाही.यंदाच्या वर्षी कोरोनाचे प्रकरण कमी झाल्यांमुळे सर्व सण साजरे केले जात आहे. त्यासाठी काही नियमावली राज्य सरकारने जारी केली आहे. त्यांचे पालन करूनच सण साजरे केले जावे असे सांगण्यात आले आहे.  
* मिरवणूक काढण्यासाठी पाच ट्रकांना परवानगी देण्यात आली आहे
* सामाजिक अंतर राखणे बंधन कारक आहे.
* सेनेटाईझरआणि मास्क वापरणे बंधनकारक आहे. 
* मिरवणुकाच्या स्वागतासाठी पोलिसांच्या परवानगीने पंडाल उभारले जाऊ शकतात.
* साबिलीजवळ 5 लोकांना उभे राहण्याची परवानगी.
* मिरवणुकीत पाण्याच्या सीलबंद बाटल्या वितरण करणे बंधन कारक 
* लोकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी करू नये. 
* मिरवणुकीत लोकांची संख्या पोलीस ठरवतील.
 या नियमावलीचे पालन करून सण साजरे करावे असे सांगण्यात आले आहे.