बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 मे 2021 (16:12 IST)

लस खरेदीसाठी राज्य सरकारने काढलेल्या ग्लोबल टेंडरला ८ कंपन्यांनी प्रतिसाद दिला

महाराष्ट्राची कोरोना पॉझिटिव्हिटी हळूहळू १ अंकी होत आहे. सध्या राज्यातील कोरोना पॉढिटिव्हिटी रेट १० टक्के आहे. राज्यात कोरोना चाचणी प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. १०० पैकी १० चाचण्यांचा अहवाल सकारात्मक येत असल्याचे प्रमाणा आहे. राज्यात २ लाख ६१ हजारपेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. कोरोनाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. कोरोनाचे प्रमाण जेवढे कमी होईल तेवढे आपल्यासाठी चांगले आहे. यामध्ये जमेची बाजू म्हणजे कोरोना लसीकरण आपण झपाट्याने लसीकरण करतो आहे. देशात लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर १ वर आहे. लस खरेदीसाठी राज्य सरकारने काढलेल्या ग्लोबल टेंडरला ८ कंपन्यांनी  प्रतिसाद दिला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदिली आहे.
 
महाराष्ट्रामध्ये २ कोटी १३ लाख ५२ हजार ३४० लसीकरण करण्यात आले आहे. कोरोना लसीकरण वाढवण्यासाठी आणि कोरोनाच्या लसीचा साठा उपलब्ध करण्याठी राज्य सरकारकडून ग्लोबल टेंडर काढण्यात आले आहे. यामध्ये ३ महत्त्वाच्या कंपन्यांनी आणि ८ लस उत्पादित कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. फायझर, स्पुटनिक, अस्ट्राझेनेका, कोरोना वॅट, जॉनसनची लस आहे. या सगळ्या कंपन्यांनी दर आणि किती लसी देणार त्याबाबत सांगितले आहे.