शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 7 जुलै 2021 (19:20 IST)

आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू होणार!

पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय आज शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. विद्यार्थांना शाळेतील नियमित शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कोविड मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. राज्यातील कोविड- मुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती /स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतली इय्यता  आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करुण्यास शासन मान्यता शिक्षण विभागाकडून दिली आहे. पालकांशी चर्चा करुन ठराव करावा आणि स्थानिक प्रशासनाच्या  सल्यानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
 
ज्या गावात आठवी ते बारावी  वर्ग सुरू करायचे आहेत त्या गावात किमान महिनाभर कोरोना नसलेल्या ग्रामीण भागात शासनाच्या नियम व अटींसह शाळा सुरु होणार आहेत. सोबतच, शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे, असे सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे हा शासन निर्णय स्थगित करून आज पुन्हा नव्याने आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.