शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जुलै 2022 (10:39 IST)

एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी

eknath uddhav
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ सुरू आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांचा पाठिंबा घेऊन भाजपसोबत पुढे जाण्याचा विचार केला. भाजपने एकनाथ शिंदे आणि या 50 आमदारांना आपले समर्थन दिले.यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची; तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
असे असले तरी यानंतरची शिवसेनेची प्रतिक्रिया आत्ता राजकारणामध्ये सर्वात महत्त्वाची मानली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी केल्याचे परिपत्रक जारी केले आहे.
 
कालच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या एकनाथ शिंदे यांची पक्षातील नेतेपदावरून हकालपट्टी झाल्यामुळे आत्ताच्या घडीला पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. यावर आता भाजप आणि शिंदे यांच्या निर्णयाकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे