शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (08:17 IST)

२७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांची घोषणा

राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा राज्य सहकारी निवडणू‍क प्राधिकरणाने जाहीर केला. या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांची घोषणा प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या परंतु आता कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानपरिषदेच्या निवडणूका घेण्यात येत आहे. यामध्ये आता सहकारी संस्थांच्या निवडणुकाही घोषित करण्यात आल्या आहेत.
प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी एक निवेदन जारी करत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. पाटील म्हणाले की, राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी ही राज्य सहकारी निवणूक प्राधिकारणावर आहे. त्या प्रमाणे या निवडणुका सुरु झाल्या आहेत मागील दीड वर्षात कोरोनामुळे निवडणूक स्थगित करण्यात आली होती.
परंतु १३ सप्टेंबरला पहिला आदेश काढून राहिलेल्या निवडणुका आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात ४ हजार संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आणि दुसऱ्या टप्प्यात पुन्हा १३ हजार संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या त्यानंतर ज्या पात्र कृषी उत्पन्न बाजारसमित्या आहेत अशा २६६ बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या परंतु काही याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली होती