शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 डिसेंबर 2022 (08:22 IST)

मौजे खापर येथील प्रभाग क्रमांक 3 अ या ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

state election commission
नंदुरबार  – राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत मौजे खापर येथील प्रभाग क्रमांक 3 अ मधील सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक प्रक्रियेत बाधा आल्यामुळे या जागेची निवडणूक रद्द समजून या जागेसाठी फेर निवडणूक घेण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी ( महसुल प्रशासन ) नितीन सदगीर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
 
असा आहे फेर निवडणूकीचा कार्यक्रम
मतदान शुक्रवार 23 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत घेण्यात येईल. मतमोजणीचे व निकाल घोषित करण्याची तारीख शुक्रवार 23 डिसेंबर, 2022 (मतदान संपल्यानंतर लगेचच) ही असेल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोमवार 26 डिसेंबर, 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असेही उपजिल्हाधिकारी श्री.सदगीर यांनी कळविले आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor