शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी आज मतदान

महाराष्ट्रातील असलेल्या मुंबई सोबत महत्वाच्या 10 महापालिका आणि 10 जिल्हा परिषदांसाठी आज मतदान होणार आहे. निवडणूक आयोगासह पोलिस, प्रशासन आणि राजकीय पक्षही चांगलेच तयारीला लागले आहेत. मुंबईसह राज्यातील 10 महापालिकांमध्ये 1268 जागांसाठी मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी तब्बल 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत. तर शहरांमध्ये 1 कोटी 95 लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत. 21 हजार पोलिंग स्टेशनवर मतदान पार पडणार आहे.
 
मतदानासंदर्भातले महत्त्वाचे मुद्दे  यामध्ये 21 फेब्रुवारीला (दुसरा टप्पा) होणाऱ्या 10 जिल्हा परिषदांतील 654 जागांसाठी 2956 उमेदवार रिंगणात उभे आहेत. तर 21 फेब्रुवारीला (दुसरा टप्पा) होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 1 कोटी 80 लाख मतदार मतदान करणार आहेत.  तर राज्यातील पंचायत समित्यांच्या 1288 जागांवर 5167 उमेदवारउभे आहेत. 
 
यावेळी मतदान होत असताना 22 हजारपेक्षा जास्त पोलिंग स्टेशन, दीड लाख कर्मचारी आणि जवळपास तितकेच पोलिस असणार आहेत. दहा महानगरपालिकांसाठी 1268 जागा, 9208 उमेदवार रिंगणात, 1.95 कोटी मतदार आहेत. तर  21 हजार पोलिंग स्टेशन. 1 लाख 30 हजार कर्मचारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये 3 हजार 461 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार तर  1 हजार 754 मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांचे उमेदवार आणि 2 हजार 663 अपक्ष उमेदवार आहेत. 
 
एक नजर उभे असलेल्या उमेदवार संख्येवर : 
महापालिका (जागा) : उमेदवार रिंगणात
 
मुंबई (227)- 2,275, ठाणे (131)- 805, उल्हासनगर (78)- 479, पुणे (162)-1,090, पिंपरी-चिंचवड (128)- 774, सोलापूर (102)- 623,  नाशिक (122)- 821,अकोला (80)- 579,
 
अमरावती (87)- 627, नागपूर (151)- 1,135  एकूण (1,268)- 9,208 उमेदवार उभे आहेत.