गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (08:26 IST)

कारागृहातून पळाला; पोलिसांनी वेशांतर करून पकडला

Escaped from prison; Police arrested him in disguise कारागृहातून पळाला; पोलिसांनी वेशांतर करून पकडलाMaharashtra Regional News  In Webdunai Marathi
राहुरी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पसार झालेला मोक्का गुन्ह्यातील सराईत आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
 
नितीन ऊर्फ सोन्या मच्छिंद्र माळी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 18 डिसेंबर 2021 रोजी मोक्का गुन्ह्यातील आरोपी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पसार झाले होते.
 
त्यातील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना तात्काळ यश आले होते. तर आरोपी नितीन माळी व रवी पोपट लोंढे हे दोघे पसार होते.
 
आरोपी माळी याच्या वास्तव्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर संदीप मिटके यांना माहिती मिळाली होती. तो माजलगाव (जि. बीड) येथे असल्याची खात्री झाल्याने पथकासह पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी वेशांतर करून माजलगाव येथून आरोपी माळी याला ताब्यात घेत अटक केली आहे.