बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 (16:39 IST)

अकोला जिल्ह्यात शेतकर्‍याने केली आत्महत्या

महाराष्ट्राच्या अकोला येथे एका शेतकर्‍याने आत्महत्या केली. सूत्रांप्रमाणे 77 वयाचे श्रीराम येउल कर्जाखाली दबलेले होते, म्हणून त्यांनी विष पिऊन स्वत:चा जीव घेतला.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहिले आहे ज्यात कर्जामुळे त्रस्त होऊन हे पाऊल उचलत असल्याचे सांगितले आहे. येउल अकोला जिल्ह्यातील उमरा गावात राहत होते.
 
स्थानिक लोकांप्रमाणे येउलची शेती 12 एकर होती, परंतू मागील तीन वर्षांपासून कमी पाऊस आणि या वर्षी अती वृष्टीमुळे पीक नष्ट झाले होते. यावेळी सोयाबीनचा उचित मूल्य मिळाला नाही ज्यामुळे ते कर्ज कसे फेडणार या विचाराने परेशान होते. येउलने ग्रामीण बँकेतून 2 लाख 10 हजार रुपय्यांचे कर्ज घेतले असून व्याज लागून ते 3 लाख रुपये झाले होते.