शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मार्च 2017 (20:37 IST)

मालेगाव : दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

मालेगाव तालुक्यातील सौंदाणे व नांदगाव (वाके) गावातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सौंदाणे येथील शेतकरी महादू कारभारी पवार(५७) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. मालेगावला एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या पवार यांनी या वर्षी पिकवलेल्या कांद्याच्या पिकातून उत्पादन खर्चही न निघाल्याने याच विवेचनेतून आत्महत्या केली.
 
दुसरीकडे नांदगाव(वाके) येथे शेतकरी जगन विठ्ठल आहिरे( ३८) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आहिरे यांच्या आत्महत्या चे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही. मालेगाव सारख्या संपन्न समजल्या जाणाऱ्या तालुक्यात एकाच दिवशी घडलेल्या या घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त होत असून कर्जमाफीविषयी विधानसभेत चाललेल्या या घटनांचे पडसाद उमटत असून शेतकऱ्याचे मानसिक खच्चीकरण होत आहे. शेतकऱ्याला मानसिक आधार देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून येत आहेत.