शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2017 (20:09 IST)

दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

नाशिक जिल्हा हदरला असून दोन तरुण शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. तर हे दोन्ही शेतकरी मालेगाव येथील रहिवासी होते.  मागील सव्वा वर्षाचा आत्महत्या पाहता जिल्ह्यात सुमारे १०९ आत्महत्या घडल्या आहेत. तर या २०१७ वर्षात जानेवारी ते एप्रिल दरम्यान २१ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे.

यातील प्रथम घटना मालेगाव तालुक्यातील निंबळके गावात घडली आहे. फक्त २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने  कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आत्महत्त्या केली आहे. राकेश शेवाळे (21) असं या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

तर दुसरी घटना मालेगाव तालुक्यातच घडली असून,  नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वाके गावात ही घटना घडली. मनोज शांताराम सावंत असं 25 वर्षीय शेतकऱ्यांचं नाव आहे. शेततळ्याच्या पाण्यात उडी घेऊन मनोज सावंत यांनी आत्महत्या केली