testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कर्जमुक्त शेतकर्‍यांची यादी बँकेच्या बाहेर लावा: उद्धव ठाकरे

राज्यातला शेतकरी खरंच कर्जमुक्त होतोय का हे पाहण्यासाठी मी फिरतोय असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. कोणत्या गावातील किती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला हे सगळ्या शेतकऱ्यांना पारदर्शक कळले पाहिजे,
गॅसची सबसिडी किती लोकांनी नाकारली हे तपासत आहे. गॅस सबसिडी नाकारणारे 2 कोटी कुठे आहेत? तसेच शेतकऱ्यांचे होईल.

कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी बँकेच्या बाहेर लावा. जे कर्जवसुलीसाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या समोर ढोल लावत होते, त्यांना आता सांगा. सगळं पारदर्शक मला कळले पाहिजे, हे जर होत नसेल तर हा भंपकपणा आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथील शेतकऱ्यांची भेट त्यांनी घेतली.


यावर अधिक वाचा :