गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 जानेवारी 2020 (10:29 IST)

'मातोश्री'मध्ये घुसण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकरी वडील आणि त्यांच्या लहान मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी आहे.
 
देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्री येथे आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोघंही आज दुपारी 12 च्या सुमारास मातोश्रीवर जाण्याच्या प्रयत्नात होते. आपल्या शेताच्या लोन संदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते रविवारी 'मातोश्री'वर आले होते अशी प्राथमिक माहिती आहे.
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले शेतकरी आणि त्यांची मुलगी दोघंही पनवेल येथे वास्तव्यास असल्याचं समजतंय. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्यांनी 'मातोश्री'त प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले आणि ताब्यात घेतले.