1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (22:19 IST)

फेरीवाल्यांच्या हल्ल्यातील जखमी कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकास पाच लाख मंजूर

Five lakh sanctioned
ठाण्यात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात पिंपळे यांना आपली दोन बोटे गमवावी लागली होती. तसेच त्यांचा अंगरक्षक याच्याही बोटाला दुखापत झाली होती. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. परंतु आता या घटनेची राज्य शासनाने दखल घेऊन या दोघांनाही प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याचा अध्यादेश काढण्यात आला असून त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांना ही मदत दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.