मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (15:16 IST)

7 जणांना अन्नातून विषबाधा

food infection
वर्धा : साक्षगंध असल्याने भावी वराकडील मंडळीबाजारात खरेदी करण्यास गेली होती. त्यांनी पत्रावळी चौकात असलेल्या अंबिका नामक हॉटेलमध्ये  नाश्ता करून दही कलाकंद खाल्ले. मात्र रात्री अचानक उलट्या सुरू झाल्यामुळे एकाच परिवारातील पाच सदस्यांसह इतर तिघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री भर्ती करण्यात आले.   
 
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार पोलिसांना करण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दुपारी हॉटेलवर करावाई सुरू होती.