शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (07:41 IST)

अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

Former Akola
अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांचा मुलगा व कार्यकर्ते यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भरगड यांच्या पक्ष प्रवेशामुळे अकोल्यात काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होईल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले.
 
गांधी भवन येथे विविध पक्षातील कार्यकर्त्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात नवी मुंबई, एरोली, डोंबिवली, माढा येथील कार्यकर्त्यांचा समावेश होता.