बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 15 जुलै 2019 (11:38 IST)

चार जणांचा बुडून मृत्यू

ठाण्यात दोन अल्पवयीन मुले तर अक्सा बीचवर तरुण बुडाले आहेत. पहिल्या घटनेत घरी न सांगता खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या शुभम देवकर (15), प्रवीण कंचारी (15) या दोन मुलांचा ठाणे पूर्व मीठबंदर रोड येथील विसर्जन घाटावर रविवारी बुडून मृत्यू झाला. हे दोघे कोपरी येथील महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाचा अर्ज भरून विसर्जन घाटावर (खाडीवर) पावसाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत शुभम आणि प्रवीण घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पालकांनी दोन्ही मुलांचा शोध सुरू केला. दोघे हरवल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यांचा शोध घेत असताना खाडीकिनार्‍यावर या दोन्ही मुलांचे कपडे दिसून आले. त्यानंतर ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी या दोघांचा खाडीत शोध सुरू केला. दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. दुसर्‍या घटनेत आक्सा बीचवर बाबू द्रवीड (22) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तर विघ्नेश दास द्रविड(21), विशाल द्रविड (23) यांना पर्यटकांनी वाचवले. हे तिघेही कांदिवली पूर्व, शास्रीचाळ आण्णानगर येथील रहिवासी होते.

फोटो: सांकेतिक