शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (18:43 IST)

केळवा समुद्रकिनारी चार तरुणांचा समुद्रात बुडून मृत्यू

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील केळवा समुद्रकिनारी चार तरुणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. मुंबईपासून केळवा बीच सुमारे 160 किमी आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केळवे  येथे फिरायला  गेलेल्या पाच  पर्यटकांपैकी चार जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला असून एकाला बाहेर काढण्यात यश आले आहे. बेपत्ता असलेल्या दोघांना शोधण्यासाठी स्थानिक पर्यटक व्यवसायिक व मच्छिमार समाजातील मंडळी युद्ध पातळीवर मदत घेतली आहे. 
 
ओम विसपुते (वय 17 वर्षे, रा. नाशिक, ब्रह्मा व्हॅली), अथर्व नाकरे (वय 13 वर्षे, रा. नाशिक, देवीपाडा), कृष्णा शेलार (वय 17 वर्षे, रा. नाशिक, ब्रह्मा व्हॅली), दीपक वडकाते (वय 17 वर्षे, रा. नाशिक, ब्रह्मा व्हॅली) असे बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावे आहे. अभिलेख देवरे ( वय 17 वर्षे, रा. नाशिक, ब्रह्मा व्हॅली) या पर्यटकाला  बुडताना वाचवण्यात यश आले आहे.हे सर्व पर्यटक मुळचे  नाशिक जिल्ह्यातील आहे.