शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (15:14 IST)

स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन

सांगलीचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक  माधवराव भुजंगराव माने यांचा वयाच्या 100 व्या वर्षी आज निधन झाले. त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते. रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे शरीर पार्थिव दर्शनासाठी  घरी ठेवण्यात आले.  
 
त्यांच्यावर 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी वयाच्या १०० व्या  वर्षी 10 जुलै रोजी पदार्पण केले. 
 
त्यांचा जन्म 10 जुलै 1924रोजी तासगाव तालुक्यातील येळावी येथे झाला.तासगाव मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. हायस्कुल मध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी क्रांतीसिह नाना पाटील यांना आपले गुरु मानले आणि शालेय शिक्षण सोडून स्वातंत्र्य लढ्यात उतरले. त्यांनी स्वतंत्र सेवेत आपले योगदान दिले. ते सांगलीकरांमध्ये अप्पा नावाने परिचित होते. त्यांच्या निधनाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्या धगधगत्या पर्वाचा कृतीशील साक्षीदार हरपला. 

आज त्यांचे निधन झाले त्यांचे पार्थिव क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ  ठेवण्यात आले असून सकाळी 11 वाजता सांगलीच्या अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली, सून , नातवंडे असा परिवार आहे.  

 Edited by - Priya Dixit