मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2023 (21:04 IST)

गौतमीचा कार्यक्रम ठेवायचा मग खिशात 5 लाख रुपये ठेवा

सांगली : काही दिवसांपासून गौतमी पाटील चांगलीच चर्चेत आहे. तिचा कार्यक्रम आणि गर्दी हे समीकरण नेहमीच दिसून येते. या गर्दीला आवर घालणे पोलिसांसमोर आणि आयोजकांसमोर एक आव्हान असते. सांगोला तालुक्यातील घिरडी गावामध्ये गौतमी पाटील आली होती. यावेळी कार्यक्रमात गर्दी होऊ नये आणि कार्यक्रम सुरळीत पार पाडावा यासाठी आयोजकांनी पोलीस बंदोबस्तासाठी तब्बल 5 लाख रुपये शुल्क भरलयाचे समोर येत आहे. आबा मोठे असे आयोजकाने नाव आहे. त्याने शुल्क भरल्यानंतर 106 पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवण्यासाठी आले होते. त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर खिशात 5 लाख रुपये ठेवायला लागणार आहेत.
 
सशुल्क बंदोबस्तामुळे कार्यक्रम शांततेत पार पडला
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गौतमीच्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गोंधळ झाला होता. त्यामुळे आम्ही पूर्व तयारी म्हणून 100 पोलीस कर्मचारी आणि 6 अधिकारी असा सशुल्क बंदोबस्त आयोजकांना प्रदान केला. आयोजकाने 5 लाख रुपयांचे शुल्क भरल्यामुळे कार्यक्रम शांततेत सुरू होता.
Edited by : Ratnadeep Ranshoor