शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (16:47 IST)

रोमिओने घेतला मुलीच्या पित्याचा बळी

murder
बीड- रोड रोमिओच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज सकाळी लातूरमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यावर आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह पोलिस ठाण्यातून हटवणार नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
 
संतप्त नातेवाईकांनी भागवत चाटे व त्यांच्या साथीदारांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. कुटुंबियांनी मुलीच्या वडिलांचे मृतदेह केज पोलीस ठाण्यात आणले असून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह पोलिस ठाण्यातून हटवणार नसल्याचे म्हणणे आहे.
 
एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याबाबत विचारणा केली असता रोमिओ भागवत चाटेने अल्पवयीन मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर शनिवारी दुपारी दोन साथीदारांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा आज लातूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
 
संतप्त नातेवाईकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत मृतदेह केज पोलीस ठाण्यात ठेवला आहे. आरोपींना अटक झाल्यावरच मृतदेह पोलीस ठाण्यातून अंत्यसंस्कारासाठी हलवावा, अशी मागणी नातेवाईक करत आहे.