शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

गोवा सरकार भाकड गायी आणि बैल सांभाळणार

गोमांस वरून गोव्याचे मुख्यमंत्री वादात सापडले होते. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका सुद्धा झाली होती. मात्र आता गोवा सरकार गायी बाबतीती मोठा निर्णय घेत आहे. यामध्ये गोव्यातील भाकड गाय आणि वृद्ध बैलांच्या शेतकऱ्यांना गोवा सरकारकडून गायी आणि बैलांच्या देखभालीसाठी खर्च  राज्य सरकार करणार आहे. यामध्ये गोवा सरकार आता  शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणार आहे. ही नवीन योजना लवकरच 3 महिन्यात तयार केली जाणार असून लागू केली जाणार आहे. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विधानसभेत सांगितले की  भाकड गाय आणि  बैलांची देखभाल शेतकरी वर्गाला  परवडणारी नाही हे सत्य आहे. त्यामुळे त्यांची अडचण होवू नये आणि आर्थिक अडचण होवू नये यासाठी  शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी योजना सरकारच्या विचाराधीन आहे.  योजनेमुळे वृद्ध जनावरे कत्तलखान्यात देण्याचे प्रकार थांबतील.