शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 जून 2018 (16:52 IST)

गोकुळचे गाईचे दूध दोन रुपयांनी स्वस्त

गोकुळचे गाईचे दूध दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे. कोल्हापुरात गोकुळच्या गाईच्या दूधाची खरेदी २३ रुपयाने होणार आहे. २१ जूनपासून नवीन दरांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुंबईत गोकुळचे गाईचे प्रतिलिटर दूधाचे दर ४४ रुपये आहेत. आता हे दूध ४२ रुपयांना मिळणार आहे. गोकूळ दूध संघाने दरात दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
गोकुळकडून दररोज साडेचार लाख लिटर दूध संकलित केले जाते. पण जेवढे दूध संकलित केले जाते त्याप्रमाणात विक्री होत नसल्याने दर कपातीचा निर्णय घेतला आहे. गोकुळची मुख्य बाजापेठ मुंबई आहे.