शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (14:46 IST)

बाप्पासोबत चुकून साडेपाच तोळ्याचं सोन्याचं मुकुटही विसर्जित

गणेश चतुर्थीनंतर शनिवारी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. या दरम्यान एका कुटुंबाकडून चुकुन गणपतीच्या मूर्तीसोबत साडेपाच तोळ्याचा सोन्याचा मुकुटदेखील विसर्जित झालं. 12 तासांनंतर मुकुट सापडलं आणि कुटुंबीयांचं विघ्न बाप्पानेच दूर केलं.
 
वसईतील पाटील कुटुंबीयांनी दरवर्षीप्रमाणे गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहाने केली. पण घरी सुतक आल्यानं पाच दिवसांच्या बाप्पाचे दीड दिवसात विसर्जन करण्यात आले. तेव्हा घाईत साडेपाच तोळ्याचे सोन्याचे मुकुटदेखील विसर्जित झाले. या मुकुटाची किंमत जवळपास तीन लाख रुपये इतके होती. 
 
विसर्जनावेळी चुकुनी सोन्याचा मुकुट विसर्जित झाल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना चिंता पडली. पण बाप्पानं आपल्या भक्तांचे विघ्न दूर केले आणि 12 तासांच्या प्रयत्नांनंतर सोन्याचं मुकुट सापडलं. 
Photo: Symbolic