गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

लेडीज चपलांमधील 11 कोटींचे सोने हस्तगत

लेडीज चपलांमधील 11 कोटींचे सोने हस्तगत
मुंबई- शिवडी गोदीमधील कंटेनरमधून कस्टम अधिकार्‍यांनी 38 किलो सोने हस्तगत केले आहे. गेल्या 20 वर्षांतील कस्टम अधिकार्‍यांची ही सर्वात मोठी कारवाई आहे. लेडीज चपलांमध्ये हे सोने लपवण्यात आले होते. या सोन्याची किंमत 11 कोटी 40 लाख रूपये आहे.
 
डोंगरी येथील एक इम्पोर्ट कंपनी अल रहमान इम्पेक्सने या महिलाच्या स्लीपर्स थायलंडमधून मागवल्या होत्या. 21 सप्टेंबर रोजी ही कन्साइनमेंट इंदिरा कॉक्सला आली आणि नंतर कस्टम तपासणीसाठी शिवडी टिम्बर पाँडमध्ये आणण्यात आले. कस्टम अधिकारी अधल्यामधल्या कंटेनर्सची तपासणी करत करतात.