testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भाजपने जे पेरले तेच आता उगवले : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता सरकारवर ‘शाब्दिक’ हल्ला चढवला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जे पेरले तेच आता उगवले आहे. खोटी माहिती पसरवण्यासाठी आणि लोकांची मने कलुषित करण्यासाठी भाजपने सोशल मीडिया नावाचे अस्त्र वापरले, तेच आता त्यांच्यावर बुमरँग झाले आहे, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये भाजपकडून दिलेली आश्वासने सत्तेत आल्यानंतरही पाळली नाहीत, याकडेही राज यांनी लक्ष वेधले.

भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ती आश्वासने दिली. लोकांची मने भडकवण्यासाठी खोट्याचे खरे करून दाखवले. विरोध करणाऱ्यांना ट्रोल करून शिवीगाळ केली. त्यांचे खच्चीकरण केले, असेही ते म्हणाले. आश्वासने पूर्ण करणे सोडाच, पण सत्तेच्या मग्रुरीत निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला ‘जुमला’ होता, असे जाहीर केले आहे.


यावर अधिक वाचा :