रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता कोल्हापूरला मिळेल नवीन वंदे भारत ट्रेन, पीएम मोदींची घोषणा
महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, 'लवकरच कोल्हापूर मधून वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येईल. आम्ही कोल्हापूर-वैभववाडीला मंजुरी दिली आहे. ज्यामुळे रेल्वेने कोल्हपूर ते कोकण जाणे सोपे होईल.
प्रवाशांना लवकरच नवीन वंदे भारत ट्रेनचा प्रवास करण्याचा आनंद उपभोगता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निवडणूक रॅली मध्ये ही माहिती दिली. त्यांनी वचन दिले की, महाराष्ट्र मधील कोल्हापूर मधून लवकरच नवीन वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'मुंबई-बेंगलुरू नॅशनल हायवेचे विस्तर काम गतीने सुरु आहे. शक्तीपीठ एक्सप्रेसवे तयार झाल्यानंतर राज्यातील मोठ्या भागांना मॉर्डन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आम्ही कोल्हापूर मधून नवीन ट्रेनची सुरवात केली आहे. लवकरच कोल्हापूर मधून वंदे भारत ट्रेन सुरु होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही कोल्हापूर-वैभववाडी ला मंजुरी दिली आहे. कोल्हापूर वरून रेल्वेने कोकणात जायला सोपे होईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोल्हापूर एयरपोर्टचे उदघाटन करून मला खोपा आनंद झाला. ते म्हणाले की, अंबाबाईच्या दर्शन आता लाखो भक्त येऊ शकतील. कनेक्टिव्हिटी वाढल्याने कोल्हापूर मध्ये इंडस्ट्री आणि डेव्हलपमेंटला चालना देण्यासाठी मदत मिळेल. नरेंद्र मोदीजींनी हिरे घोषणा तेव्हा केली आहे जेव्हा भारतीय रेल्वेचा वंदे भारत मेट्रो ट्रेन वर फोकस आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये अनेक शहरांमधून वंदे भारत ट्रेन चालवण्याचा प्लॅन आहे.
Edited By- Dhanashri Naik