गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (09:17 IST)

10वी उत्तीर्णांसाठी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयात बंपर भरती, असा करा अर्ज

govt jobs
ASC Centre South Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत एएससी दक्षिण सेंटर 2ATC साठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा.
 
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. ASC Centre South Recruitment 2024
 
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कुक 03
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
2) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 03
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
3) MTS (चौकीदार) 02
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
4) ट्रेड्समन मेट 08
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
5) व्हेईकल मेकॅनिक 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
 
6) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 09
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
7) क्लिनर (सफाईकर्मी) 04
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
8) लिडिंग फायरमन 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे
9) फायरमन 30
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे
10) फायर इंजिन ड्राइव्हर 10
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्ष अनुभव
 
वयोमर्यादा : 18 ते 27 वयापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
या पत्त्यावर अर्ज पाठवावा..
अर्ज करताना लक्षात ठेवा की, अर्जासोबतच तुम्हाला तुमच्या सध्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यावा लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 फेब्रुवारी 2024 आहे. पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र दक्षिण 2 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.
पगार : 18000/- ते 21,700/-

Edited By - Ratnadeep ranshoor