Widgets Magazine
Widgets Magazine

जीएसटीसाठी 17 मे ला विशेष अधिवेशन

GSTBill
Last Modified बुधवार, 26 एप्रिल 2017 (12:51 IST)

(जीएसटी) विधेयकासाठी विधानमंडळाचं विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयकासह संबंधित इतर विधेयकांना मंजुरी देण्यासाठी हे अधिवेशन असेल. विशेष अधिवेशन 17 मे 2017 रोजी घेण्याचा येणार आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 246 (क) मधील तरतुदीनुसार केंद्र व राज्यास वस्तू व सेवांवर कर लावण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्या अधिकारांतर्गत राज्याच्या विधानमंडळाने वस्तू व सेवा कर विषयक पारित करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे.

संबंधित विधेयके विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात ज्या दिवशी मंजूर होतील त्या दिवसाचे सभागृहाचे कामकाज समाप्त झाल्यानंतर विशेष अधिवेशन स्थगित करण्याबाबत राज्यपालांना शिफारस करण्यात येणार आहे.यावर अधिक वाचा :