गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2017 (13:32 IST)

नव वर्षाचे स्वागत महारांगोळीने होणार

गुडी पाडवा अर्थात नवीन वर्षाचे स्वागत करण्या करिता सर्व तयार झाले असून, या करीता गोदावरीच्या घाटावर महारांगोळी साकरण्यात आली आहे.  ही रांगोळी100 फूट बाय 200 फुट या आकारात असून  5 हजार किलो रंग आणि 3000 किलो रांगोळी वापरली आहेत. महारांगोळी नागरिकांना बघण्यासाठी 26 ते 28 तारखेपर्यंत खुली असणार आहे .शहरातील नववर्ष स्वागत समिती राष्ट्रीय विकास मंडळाने मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गंगाघाटावर महारांगोळी काढण्यात आली आहे. संत त्यांचे विचार त्यांचे कार्य आणि  शिकवण यावर आधारित असून.  या रांगोळीमध्ये सर्वात मध्यभागी विठ्ठलाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ही रांगोळी पाहण्या करिता नाशिककर गर्दी करत आहेत.
135 महिला व पुरुषांच्या मदतीने सुमारे 5000 रंग व 3000 किलो रांगोळी वापरण्यात आली आहे.रांगोळीच्या केंद्रस्थानी विठ्ठलाचे रुप असुन त्यानंतरच्या वर्तुळात चंद्रभागेचे पाणी,दिंडी रेखाटली आहे.विठ्ठलाच्या भोवती पितांबराचा पिवळा रंग, तुळशीमाळ, चंदन, कुंकू, बुक्का असे प्रतीक रूप आहे.