शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (18:17 IST)

कोरोनानंतर राज्यावर गारपीटीचे संकट

28 ते 29 डिसेंबर या कालावधीत मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किरकोळ वाढ झाली आहे.
कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट नोंदवण्यात आली आहे. तसेच राज्यातल्या अनेक भागांत गारपीटीची शक्यता मुंबई हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच  विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,सातारा, सांगली,सोलापूर तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणीआणि हिंगोली जिल्ह्यात गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.