शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 मार्च 2022 (08:27 IST)

कट्टर शिवसैनिक भाजपला मतदान करणार नाही

कोल्हापूर भाजप हा शिवसेनेचा एक नंबरच शत्रू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानणारा कट्टर शिवसैनिक कधीही भाजपला मतदान करणार नाही. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जयश्री जाधव निवडून येण्यास कोणताही अडचण नाही, अशा शब्दात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी ग्वाही दिली आहे.
 
महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी बुधवारी राजेश क्षीरसागर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी क्षीरसागर यांना विजयासाठी आवाहन केले. क्षीरसागर यांनी भाजपचे भूत शिवसेना कधीही मनगुटीवर बसू देणार नाही. आपला विजय हा महाविकास आघाडीचा आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचा असणार आहे. त्यामुळे कट्टर शिवसैनिक मातोश्रीच्या आदेशानुसार महाविकास आघाडीबरोबर असणार आहे. तो कदापि भाजपला मतदान करणार नाही, असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. यावेळी वैशाली क्षीरसागरही उपस्थित होत्या.